गुरुजींबद्दल

khadake-guruji

‘यतो धर्मः स्ततो जयः’  ज्या ठिकाणी धर्म आहे त्या ठिकाणी जय आहे. म्हणून धर्माचरण करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, त्याच प्रमाणे पूजापाठ तसेच ज्योतिष शास्त्र याकडेही नवीन पिढीचा ओढा आहे. त्याचप्रमाणे हे असच का अशी चिकित्सा हि वाढत आहे, आणि ती योग्य हि आहे. हिंदू धर्माने चिकित्सेलाही विशाल अंतःकरणाने स्वीकारले आहे. पूर्वीच्या काळी प्रत्येक व्यक्तीने धर्ममार्गाने चालावे यासाठी कुलगुरू वा कुलपुरोहित  असत, याचे इतिहासात अनेक दाखले उपलब्ध आहेत.

 सध्याच्या स्थितीत मोठ्या शहरात शास्त्रशुद्ध मार्गदर्शन करणारे पुरोहित ही कमी होत आहे. हाच धागा पकडून पुण्यातील वेदमूर्ती श्री किशोरशास्त्री खडके गुरुजी यांनी  www.gurujipune.com  या शास्त्रशुद्ध व सखोल माहिती देणाऱ्या संकेत स्थळाची निर्मिती केली आहे. चांगले पुरोहित समाजात जावे, त्यांनी यजमानांची कामे त्यांना समाधान होईल अशी करावीत, आणि यामुळे समाजाची धर्मभावना वाढीस लागेल, समाज सक्षम व सुसंस्कृत होण्यासाठी प्रयत्न करणे, हाच खरा यामागचा सदुद्देश आहे.

वेदमूर्ती श्री किशोर खडके गुरुजी यांचे वेदाचे अध्ययन विद्येची प्राचीन नगरी श्रीक्षेत्र आळंदी येथे ‘अध्यात्मिक प्रतिष्ठान’ या संस्थेत वे.शा.सं. श्री विश्वनाथशास्त्री जोशी गुरुजी यांच्याकडे झाले असून, घरी ज्येष्ठ बंधू ज्योतिषाचार्य श्री कैलास शास्त्री खडके गुरुजी यांच्याकडे कर्मकांड व ज्योतिष अध्ययन झाले.

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या थोर परंपरेतील वेदशास्त्रसंपन्न महामहोपाध्याय प.पु. श्री यज्ञेश्वरशास्त्री कस्तुरे यांचे श्री गुरुजी अनुग्रहित आहेत. आजपर्यंत अनेक देश विदेशातील परिवार यानिमित्त गुरुजींशी जोडल्या गेलेले आहेत. अनेक देशातील अनिवासी भारतीय संकेत स्थळाला भेट देत असून, अनेकजण online मार्गदर्शन घेत आहेत. अनेकांनी याच कौतुकही केलेलं आहे.

विविध व्रतवैकल्य, रुद्र अभिषेक, गृहप्रवेश, वास्तुशांती, ग्रहयज्ञ, विवाह, उपनयन, नवचंडी, श्राद्ध आदी विविध विधीं करण्यासाठी पुण्यासारख्या मोठ्या शहरात गुरुजींची सारखी गरज भासते, ती गरज या संकेतस्थळामुळे पूर्ण होईल असा विश्वास आम्हाला वाटतो.  

आपल्या सूचनांचा आदर केला जाईल.

सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामय: !

सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित दुःख माप्नुयात !!

ओम शांती:

गुरुजी पुणे
परंपरा विधियुक्त पद्धतीची

0 +
अनुभवी गुरुजी/पंडित
0 +
पूजा
0 +
समाधानी यजमान

या वृक्षाला भरपूर आयुष्य असते म्हणून याला ‘अक्षय’ वृक्ष असे म्हणतात. अश्वत्थ हेही त्याचेच नाव. ज्या वृक्षाखाली बसले असताना गौतम बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या विशिष्ट वृक्षाला बोधिवृक्ष म्हणजेच ‘ज्ञानाचा वृक्ष’ म्हटले जाते.

पिंपळवृक्षाचे औषधी महत्त्व

पिंपळवृक्षाचे आध्यात्मिक महत्त्व

 

श्रद्धया क्रियते तत् श्राद्धम:’ श्रद्धेने पितरांना, मृत व्यक्तींना उद्देशून विधिवत् हविषयुक्त पिंडदान आदी कर्म करणे यालाच श्राद्ध म्हणतात. जे श्राद्ध कर्मे करतात. त्यांना पितर संतुष्ट हेऊन आयुष्य, कीर्ती, बल, धन, पुत्र, संसार-सुख, आरोग्य व सन्मान प्राप्त करवितात.

भाद्रपद महिन्यातील कृष्णपक्षातील पूर्ण पंधरवड्यास ‘श्राध्दपक्ष‘ म्हटले जाते.

पितृपक्षाला पितृपंधरवडा, पित्तरपाट, श्राद्धपक्ष, हडपक्ष, पित्रीपोखो, सोळाश्राद्ध पक्ष, कणागत, जतीया, महालय पक्ष आणि अपारा पक्ष अशा वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते.

मुलगा व मुलगी यांनी एकमेकांना पसंत केल्यानंतर वडिलमंडळी एकत्र येऊन लग्नाची इतर बोलणी करतात, त्यानंतर साखरपूड्याची तारीख ठरवली जाते. खरे तर साखरपुडा हा विधी अलीकडील काळात सुरू झालेला आहे. पूर्विच्या काळी वाक्दान किंवा वाड्ःनिश्चय असा विधी केला जात असे.

 “सोळा सोमवार” व्रत हे श्रीशंकराचे शीघ्र फलदायी व्रत आहे. श्रावण महिन्यात या व्रताला सुरवात करण्याचे विशेष महत्व असते.

गृहप्रवेश, वास्तुशांती, नवचंडी, विष्णुयाग, सुदर्शन याग, पंचायतन याग, कुंभ / अर्क विवाह, उदकशांती, आदि सर्व धार्मिक विधी आम्ही साहित्यासह करतो, आमचे हजारो संतुष्ट यजमान याची साक्ष अभिप्राय मधे देतात. www.gurujipune.com चा उद्देशच मुळात यजमानांची सोय करणे, चांगले पुरोहित समाजात पाठवणे व धर्म भावना वाढवणे हा आहे.

online जन्मपत्रिका मार्गदर्शन हि सेवा

online

श्रावणात सोळा सोमवारव्रत, उद्यापन, रुद्राभिषेक लघुरुद्र, महारुद्र अभिषेक

गणपती उत्सवाचे १० दिवस म्हणजे प्रसन्नतेचे दिवस, बर्याच जणांना प्राणप्रतीष्ठेसाठी गुरुजींना बोलवायची इच्छा असते. परंतु वेळेअभावी ते शक्य नसते, म्हणून घरच्याघरी विधियुक्त पद्धतीने प्रतिष्ठा होण्यासाठी सदरील माहितीचा उपयोग होईल.

श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी.......

इति पूजाविधी ।।

अनंत चतुर्दशीला श्रींचे उत्तरपूजन व विसर्जन

गणपती स्तोत्रं

गणपती बाप्पाची १०८ नांवे..

वाढदिवसाच्या दिवशी घरातील स्त्रिया ओवाळतात ते शुभसूचक आहे. त्या व्यक्तीला नुसते दीर्घायुष्य लाभावे हा हेतू नसून आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभावे हा आहे. भारतीय पद्धतीत आरोग्य व दीर्घायुष्य दोन्हीही मिळावे हि प्रार्थना आहे.

वाढदिवसाच्या विधीमध्ये गणपती, कुलदेवता, सूर्य इत्यादी देवतांप्रमाणेच अमर अशा सप्तचीरंजीवाची प्रार्थना केली जाते.

सर्वसाधारण विधी

संध्या हे कर्म नसून उपासना आहे. संध्या हि सूर्याची उपासना आहे. कारण गायत्री मंत्र हा सूर्य विषयक आहे. सूर्य उपासना म्हणजे ब्रम्ह उपासना आहे. एवढे संध्येचे महत्व आहे. सूर्यामुळेच पाऊस पडतो. सूर्यामुळे आरोग्य लाभते, संध्या करण्याने आरोग्य संपन्न दीर्घायुष्य लाभते. म्हणून प्रत्येक धर्माभिमानी हिंदूने अवश्य संध्या करावी.

संध्या ही दिसायला लहान अशी गोष्ट असली तरी,तीच असणार महत्व निश्चितच मोठ आहे. १] आचमन २] प्राणायाम ३] अर्घ्यदान ४] जप ५] द्विराचमन

संक्षिप्त संध्याविधी

ओम म्हणजे काय? सगळ्या समस्यांवर एक रामबाण उपाय

ओमकाराची रचना आणि शरीरावर होणारे त्याचे परिणाम, ओमकारचा चमत्कार, ओमकाराची किमया

हा मंत्रोच्चार कसा करावा?

म्हणावयाची कृती

दिवाळी लक्ष्मीपूजन

दीपावली हा एक प्रमुख हिंदू सण आहे. हा दीपोत्सव भारतात सर्वत्र साजरा होतो. या सणाला घरात व घराबाहेर तेलाचे लहान दिवे लावले जातात.

कथा, पूजाविधी

दिवाळीला पूर्ण नियमांनी लक्ष्मी देवीची पूजा केल्याने याचे शुभफळ संपूर्ण वर्षभर मिळते.

गुरू पौर्णिमा / व्यास पौर्णिमा

आषाढ शुद्ध पौर्णिमेला आपण गुरू पौर्णिमा किंवा व्यास पौर्णिमा असे म्हणतो.

विविध शांती पूजा

जनन शांती – माहिती ,कधी जनन शांती करावी

उदकशांती

ज्योतिष विषयक मार्गदर्शन

ज्योतिषशास्त्र

१२ राशी व त्यांचे स्वभाव

रुद्राक्ष

सूर्यग्रहण आणि चंद्रग्रहण माहिती

जेव्हा सूर्यचंद्र आणि पृथ्वी हे साधारण सरळ रेषेत येतात तेव्हा सूर्यग्रहण होतेजेव्हा सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये चंद्र येतो तेव्हा अमावस्या ही तिथी असतेम्हणजेच सूर्यग्रहण हे अमावस्येलाच होते.

चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण,

खंडग्रास चंद्रग्रहण

|| यजमानांचा अभिप्राय ||

खडके गुरुजींच्या असंख्य यजमानांपैकी काही निवडक अभिप्राय.

आपल्या उपक्रमास अनेक उत्तम आशीर्वाद व शुभेच्छा.
भानुदास एकनाथ.

संत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज ह.भ.प.योगीराज महाराज गोसावी(पैठणकर)

“पूजा किंवा धार्मिक कार्य करत असताना पूजा सांगणाऱ्या गुरुजींचे ज्ञान तसेच वेदाध्ययन या गोष्टींची प्रचिती सुज्ञ माणसाला लगेच येते.
मी अनेक धार्मिक विधी व पूजा-पाठ करतो, व श्री किशोर खडके गुरुजी हे आमचे नेहमीचे गुरुजी आहेत.”

प्रसिद्ध उद्योगपती. श्री गिरीधरजी काळे (Chairman – Seaco Foundry )

“कुठलेही धार्मिक कार्य मनासारखे झाले तर, एक प्रकारे मनःशांती लाभते. ते कार्य गुरुजी करतात असा माझा विश्वास आहे. आपल्या उपक्रमास अनेक शुभेच्छा.

प्रसिद्ध उद्योगपती. श्री हणमंत राव गायकवाड (Chairman B.V.G Group)

“तुम्ही कोणत्याही क्षेत्रात असाल, नोकरदार असाल किंवा व्यावसायिक ..तुम्हाला तुमच्या कार्यात यश मिळवण्यासाठी परमेश्वराचा वरदहस्त मिळवण्याची गरज असते. तुमच्या क्षेत्रात यशाच्या पायऱ्या चढत असताना परमेश्वरी अनुष्ठान तेवढेच महत्वाचे असते. . हे सर्व धार्मिक विधी करत असताना, श्री खडके गुरुजी आम्हाला अत्यंत व्यवस्थित पद्धतीने एक एक विधी समजावून सांगतात तसेच आमच्याकडून कार्य करून घेतात..”

सुप्रसिद्ध संगीतकार श्री. अजय व श्री. अतुल

पुण्यासारख्या प्रचंड मोठ्या शहरांमधे धार्मिक कार्यांसाठी गुरुजी शोधन तस अवघड काम आहे, त्यात व्यवस्थित विधी झाले म्हणजे मानसिक शांती मिळते.
www.gurujipune.com
या वेब साईट मुळे पुण्यातील व पुण्याबाहेरील लोकांची सोय झाली असं म्हणायला हरकत नाही.
अनेक शुभेच्छा.

श्री श्रीकांत व शशांक परांजपे. परांजपे बिल्डर (डायरेक्टर)

“www.gurujipune.com या संकेत स्थळास आमच्या अनेक शुभेच्छा.”

श्री चंद्रकांत निम्हण हॉटेल ग्रीन पार्क, बाणेर रोड, पुणे

आपल्या शंका व समस्या आम्हाला कळवा. गुरुजी मार्गदर्शन करतील.